Sunday, August 31, 2025

On Self discovery, Kavi Grace

आत्मशोधाच्या आंधळ्या वाटेवर चाचपडत जाणाऱ्या प्रत्येक वाटसरूला कुठे न कुठे भेटणारा सहयात्री सिद्धार्थ. बुद्धाच्या सिद्धी पेक्षाही मला त्याचे सिद्धार्थपण जास्त मोलाचे वाटते. तसे त्याने फारसे दुःखही पाहिले भोगले नव्हतेच, पण एवढ्याशा दुःखाच्या दर्शनाने ही त्याचे राजीवंशी अस्तित्व उध्वस्त झाले. हा उध्वस्तपणा झेलतानाच्या सर्व व्यथा ओंजळीत घेऊन तो तडक निघाला. व्यथेला ईश्वरी करुणेची परिमाणे देण्यासाठी पुरी फुटून निघाला. अनुभवाचे पंख कापून दुःखाला मानवतावादाची शिस्त लावण्याची त्याने घाई केली नाही. ज्याने आयुष्यभर कुठल्याही प्रस्थापित मूल्यांचे दडपण मानले नाही आणि निर्माण अस्तित्वाची जडणघडण होत असताना या प्रक्रियेला कुठल्याही तडजोडीच्या वेठीस धरले नाही तो सिद्धार्थ. त्याचे व्यासपीठ होऊ शकत नाही,करू नये. व्यासपीठे म्हणजे अस्तित्व शोधाचे पंख कापून मुद्दाम दुबळ्या केलेल्या सामर्थ्याची चेष्टा करणारे कत्तल खाने असतात. बौदेलैर या फ्रेंच कवीने अल्बाट्रॉस नावाच्या महापक्ष्यावर एक कविता लिहिली आहे. या पक्षाचे पंख अजस्त्र असतात, डौलदार असतात. आकाशात भरारी मारणे हेच त्याचे सामर्थ्य आणि सौंदर्य. पण या पंखांचे वजन जमिनीवरून चालताना पेलत नसल्याने हा पक्षी फार केविलवाणा दिसतो. जहाजावरच्या एका कॅप्टनने अशा एका समुद्र पक्षाला बेताबेताने गोळी घालून अर्धवट जायबंदी केले आणि मग डेकवर मजेत चिरूट ओढत तो त्या अगडबंब पक्षाच्या देहाची केविल वाणी बेढबचाल बघत राहिला. घायाळ सामर्थ्याची चेष्टा करण्याची उर्मी आणखीनचनावर झाली तेव्हा कॅप्टनने या महापक्षाच्या पंखाला जळत्या चिरूटाचे टोक लावले. अनवट वेणीच्या चिरेबंद नक्षीत छिद्र पाडल्यावर कॅप्टनला कृतकृत्य झाल्यासारखे वाटले. चार सवंगडी बोलावून मग तो महासामर्थ्याच्या चेष्टेत स्वतःचे आत्मप्रतारक सामर्थ्य शोधण्याचा प्रयत्न करीत राहिला. सिद्धार्थाच्या आयुष्यातील प्राण तत्त्वाची पिंजण नाकारून त्याच्या सिद्धीला मानवतेचे तत्त्वज्ञान मानणारी व्यासपीठे बघितली की मला अपरिहार्यपणे समुद्रावरच्या महापक्षाची टिंगल टवाळी करणारी शहाण्यांची सभा आठवते. व्यासपीठे अशीच बेमालूमपणे माणसांची विटंबना करीत राहतात. अनुभवांच्या तोडमोडीला घेऊन तडजोडीचा मार्ग स्वीकारण्यासाठी पठडीचा आश्रय. मग प्रेषिताच्या व्यथा सूत्रांची काय? शरणमंत्रांनी आणि मुल्ला मौलवींच्या पहाट गजरांनी आवाजाची दुनिया घटकाभर स्तब्ध होत असेल पण ती हादरून जात नाही. मंत्रामागचे प्रेषितांचे अनुभव हेच खरे मार्गदर्शक असतात. पठडेबाज गुरूंच्या आश्रयाने मार्ग तर सापडत नाहीतच उलट दिशाभूल होत राहते . अशी दिशाभूल नाकारणे व स्वीकारणे हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न. पण नाकारल्याशिवाय अस्तित्वाला हादरे बसत नाहीत आणि हादरे बसल्याशिवाय काही नवनिर्माण होऊच शकत नाही ही दुःखवैभवाची संपन्नता. यासाठी पठडी सोडून सृजन प्रलयाला सामोरे जाणे हीच सिद्धार्थ पणाची तपस्या.


Translation

On the blind path of self discovery, every passerby somewhere or the other intersects one fellow traveller - Siddharth. More than Buddha’s achievements, I find his Siddharth-ness more valuable. To be sure, he hadn’t seen or experienced much adversity, but the encounter of mere sorrow brought his princely existence at stake. Devastated at once, he set out carrying all the pain promptly in his arms. He wholeheartedly devoted himself in order to measure suffering into the dimensions of divine compassion. He did not deny his own experience of sorrow in order to quickly discipline adversity within the imposition of humanity. The one who did not subscribe to any established values of society in his life and did not interfere in the make up of existence while in the process of one’s own self evolution - is Siddharth. Nor can this process be staged, and neither should it be attempted. Theories are essentially slaughterhouses of the wings taken during the flights of self discovery, mocking at the sheer will that one puts into it.  The French poet Baudelaire has written a poem about a giant bird called albatross. The bird's wings are featherless and graceful. To fly through the sky itself is its boldness and beauty. But the weight of its wings makes this bird appear very clumsy while walking on the ground. A ship's captain accidentally shot one of these seabirds and partially captured it, and then, while having fun dragging its claws across the deck, he watched the whirring of the bird's body. When his urge to play at brute force reached its climax, the captain attached the wing of the giant bird to the tip of a burning torch. Upon drilling a hole in its untwisted braid, the captain felt a sense of accomplishment. Calling four companions, he then kept on trying to find his own self-propulsive power. In overlooking the trapping of Siddhartha’s soul into the cage of life/existence and looking at his findings as the foundation of human philosophy,  I am inevitably reminded of the meeting of the wise men who were tinkling with the mermaid's ring on the sea. Theories continue to make a mockery of people in this way. They are the refuge that people take to succumb to an accepted normal rather than acknowledging the difference of experience. Then what about the Prophet's sufferings? The world may be temporarily silenced by the sermons of ministers and the dawn alarms of the mullahs, but it does not shake the world.  The experience of the apostles that lie behind the mantra is the real guide. Taking refuge in deceitful gurus, one not only fails to find the path, but instead continues to be misled. Whether to accept or reject such misguidance is a personal choice. But existence cannot be shaken without rejection, and without shaking, no renewal can take place. This is the glory of suffering and grief. To leave the plateau for immersing oneself in this flood-plain of creation is the penance of self discovery.


No comments: