Wednesday, September 17, 2025

On Existentialism

 एक गोष्ट


"मी जन्माला आलो नसतो तर किती बरं झालं असतं," ब्राह्मण म्हणाला.


"का रे, बाबा?" मी विचारले.


"कारण," तो म्हणाला, "गेली चाळीस वर्ष मी अध्ययन करतो आहे आणि मला वाटतं, हा सर्व काळ फुकट गेला. मी जड द्रव्यातून बनलो हे खरं; पण विचार कोठून निर्माण होतात याविषयी मी अद्यापही अज्ञानी आहे. मला हेही समजत नाही की, माझं आकलन माझ्या चालण्यासारखी वा माझ्या पचनक्रियेसारखी सहज प्रेरणा आहे, का मी हातानं एखादी वस्तू धरतो तसा डोक्यानं विचार पकडतो... मी खूप बोलतो, पण ते संपल्यावर मी जे बोललो त्याची मलाच लाज वाटते."


त्याच दिवशी त्या ब्राह्मणाजवळच राहणाऱ्या एका वृद्ध बाईशी माझं बोलणं झाले. मी तिला विचारलं, "तुझा आत्मा म्हणजे काय आहे? आणि ते तुला माहीत नसेल तर त्याचं तुला दुःख होत नाही?" तिला मी काय म्हणतोय हेच मुळी कळलं नाही. तिने आयुष्यात क्षणभरसुद्धा भल्या ब्राह्मणाला छळणाऱ्या गोष्टींचा विचार केला नव्हता. तिची विष्णूच्या अवतारांवर श्रद्धा होती आणि गंगाजलात एकदा स्नान करायला मिळालं, तर जन्माचं सार्थक झालं यावर तिचा विश्वास होता. तिच्या सुखी, समाधानी वृत्तीनं प्रभावित होऊन मी तत्त्वज्ञानी ब्राह्मणाला म्हटलं, “तुझ्याजवळच एक वृद्ध बाई कसलाही गहन विचार करीत नाही आणि सुखासमाधानानं जगते आहे, याची तुला लाज नाही वाटत?"


"तू बरोबर आहेस," ब्राह्मण म्हणाला, "हजार वेळा मी स्वतःला सांगितलं की माझ्या शेजाऱ्याप्रमाणे मी अज्ञानात राहिलो तर सुखानं जगेन; तरी पण तशा सुखाची मला इच्छा होत नाही."


ब्राह्मणाच्या उत्तरानं कशापेक्षाही मी अधिक प्रभावित झालो.


- व्हॉल्टेअर




Translation / English

An Anecdote

"How better would it have been had I not been born," Brahmin said.

"Why do you say that?" I asked.

"Because," he said, "for the past forty years I have been studying and all this while has been wasted. The fact that I am made out of a solid material, but I am still unaware about where thoughts are created. I do not even understand if my analysis is as involuntary as my walking or the process of digestion, or whether I hold ideas knowingly like I hold something consciously in my hands ... I speak a lot, but I myself feel embarrassed of what I have said eventually."

On the same day, I got a chance to speak to an old woman who used to live near that Brahmin. I asked her, "What is your soul? And if you do not know what it is, does it not trouble you?" She did not seem to understand what I was even saying. She had not thought even for a fraction of her life about things that may be bothering a Brahmin. She had faith in the incarnations of Vishnu and believed that if she could bathe in the waters of the Ganges once, her life would be worthwhile. Impressed by her happy, contented attitude, I said to the philosophical Brahmin, "Aren't you ashamed that there is an old woman next to you who doesn't think deeply and lives happily?"

"You are right," said the Brahmin, "a thousand times I have told myself that if I remained in ignorance like my neighbor, I would live happily; yet I do not desire such happiness."

I was more impressed by the Brahmin's answer than anything else.

- Voltaire

No comments: